‘येऊ कशी तशी मी नांदायला’; अखेर स्विटूने दिली प्रेमाची कबुली, ओम-स्विटूच्या लग्नाचा मुहूर्त निघणार?

मुंबई 4 मे : झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla)  एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर तसंच रूसव्या – फुगव्यांनंतर स्विटूने (Sweetu) ओमच्या (Om) प्रेमाला कबूली देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे ओमलाही मोठा सुखद धक्का बसला आहे.

स्विटूच्या आई बाबंनी स्विटूचं पाताळयंत्री मोहीत सोबत लग्न ठरवलं आहे. स्विटूला या गोष्टीचा फार त्रास होतोय, पण नलूच्या म्हणजेच आईच्या इच्छेसाठी स्विटू लग्नाला होकार देते. तर दुसरीकडे मोहीतची आई साळवी कुटुंबाकडे लग्नात मोठमोठ्या वस्तूंची मागणी करत आहे. त्यामुळे स्विटूची आई मोठ्या चिंतेत पडली आहे. स्विटूही ओव्हरटाईम काम करून पैसे जमा करत आहे. त्यासाठी ती जास्तीत जास्त मुंबईला खानविलकरांच्या घरी थांबतेय. पण आता तिला ओमच्या प्रेमाची जाणीव होत आहे.

दुसरीकडे फ्रॉड मोमो मात्र खानविलकरांच्या घरातील मौल्यवान वस्तू चोरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. पण तिचा तो प्रयत्न फसतो. त्यामुळे मोमो ही कोणीही श्रीमंत घरातील मुलगी नसून, ती फक्त पैसे लुबाडण्यासाठी आली आहे हे खानविलकरांच्या लक्षात कधी येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

स्विटू आता तिच्या मनातील सगळ्या भावना ओमसमोर व्यक्त करत आहे. स्विटू आणि ओमच्या प्रेमाला शकू, रॉकी यांचा पूरेपूर पाठिंबा आहे. पण मालविका मात्र ओम आणि स्विटूच्या प्रेमाला कधीच होकार देणार नाही. तर दुसरीकडे नलूने आधीच स्विटूला बजावलं आहे. ओम आणि तुझं काहीही होऊ शकत नाही असंही तिने म्हटलं होतं. त्यामुळे आता ओम आणि स्विटू त्यांच्या प्रेमाची परीक्षा कशी पास करणार हे येणाऱ्या भागांमध्ये स्पष्ट होईल. ओम आणि स्विटूचं लग्न कधी होणार आणि स्विटू खानविलकरांच्या घरी नांदायला कधी येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: