Video | ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना…’, कीर्तीचा हा डान्सिंग अंदाज पाहून चाहतेही म्हणाले वा!

मुंबई : छोट्या पडद्यावरची ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Matichaa) ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. यातील ‘शुभम’, ‘कीर्ती’, ‘जिजी अक्का’ ही पात्र प्रेक्षकांच्या मनाला भावली आहेत. मालिकेत सुनेची भूमिका साकारणारी ‘कीर्ती’ अर्थात अभिनेत्री समृद्धी केळकर (Samruddhi) सध्या ती खूप चर्चेत आली आहे. समृद्धीने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर सुरु असलेला ट्रेंड ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना’ या गाण्यावर ठुमके लगावतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे (Phulala Sugandh Matichaa fame actress Samruddhi kelkar share dance video on social media).

टीव्हीच्या पडद्यावर सध्या भोळ्या स्वभावाची आणि साडीत वावरणारी कीर्ती या व्हिडीओमध्ये प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. कीर्तीच्या या अदा पाहून प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

या व्हिडीओत ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना’ या गाण्यावर समृद्धीने डान्स केला आहे. जीन्स आणि क्रॉप टॉप अवतारात समृद्धी केळकर खूपच कुल दिसत आहे. सोबतच तिच्या डान्स मुव्ह्ज देखील चाहत्यांना भुरळ घालत आहेत. समृद्धी अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम नर्तक देखील आहे (Phulala Sugandh Matichaa fame actress Samruddhi kelkar share dance video on social media).

समृद्धी अभिनयाबरोबरच नृत्यक्षेत्रात देखील सक्रिय आहे. तिने कथ्थक या नृत्यप्रकारात पदवी संपादन केली आहे. लॉकडाऊन काळात समृद्धीने अनेक मुलांना नृत्य शिकवले. समृद्धी सुरुवातीपासूनच मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होती. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेच्या आधीही तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

मालिकेची कथा

सध्या ही मालिका टीआरपी शर्यतीत आघाडीवर आहे. प्रख्यात अभिनेत्री अदिती देशपांडे (Aditi Deshpande) ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत जिजी अक्का ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. जामखेडकर कुटुंबाचा ती कणा. कमी शिकलेली सून असावी, अशी जिजी अक्काची मुलाच्या लग्नापूर्वी अट असते. मात्र आयपीएस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कीर्तीची लगीनगाठ जिजी अक्कांचा मुलगा शुभमशी बांधली जाते. लग्नाच्या वेळी जिजी तिच्या होणाऱ्या सूनेच्या शिक्षणाविषयी अनभिज्ञ असते. परंतु अचानक लग्नानंतर कीर्तीच्या शिक्षणाविषयी समजतं, तेव्हा जिजी अक्काची भूमिका काय असते, हे मालिकेत पाहायला मिळालं.

सध्या मालिकेत शुभम आणि कीर्तीमध्ये खऱ्या अर्थाने प्रेमाचं नातं फुलत आहे. दोघांमधले गैसमज दूर होऊन ते पती-पत्नीप्रमाणेच एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिणी बनू लागले आहेत. लवकरच या मालिकेत आणखी एक वळण पाहायला मिळणार आहे.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: