
मलायका आरोरा ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैक एक म्हणून ओळखली जाते.

जबरदस्त डान्स आणि मादक अदांच्या जोरावर तिनं बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

चित्रपटांसोबतच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील चर्चेत असते.

काही वर्षांपूर्वी तिनं अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. जवळपास 20 वर्षांचं वैवाहिक नातं त्यांनी तोडलं.

त्यामुळं बॉलिवूडमधील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु मलायकाची अर्जून कपूरसोबतची मैत्री तिच्या पतीला आवडत नव्हती त्यामुळं त्यांचा घटस्फोट झाला असं म्हटलं जात होतं.

अर्थात ही चर्चा अफवा नसून ती खरी ठरली कारण घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जूनसोबत लिव्हईन रिलेशनशिपमध्ये राहात आहे.

अर्जुन आणि मलायका अनेक सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये एकत्र जाताना दिसतात.

सध्या ते दोघं मुंबईमध्ये एका आलिशान फ्लॅटमध्ये राहात आहेत. त्यांच्या फ्लॅटची किंमत 10 ते 12 कोटी रुपये इतकी असल्याचं म्हटलं जात आहे.

मलायका आपल्या घराचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते.

हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान हिनं तिचं घर डिझाईन केलं आहे.
source:news18
0Shares