तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, वाऱ्यासह मुसळधार वृष्टीची शक्यता

सिंधुदुर्ग : अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होऊन त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊन 18 मे च्या दरम्यान ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 ते 17 मे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर येऊन आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात या काळात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, वाऱ्यासह मुसळधार वृष्टीची शक्यता

हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या काळात येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यानी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, वाऱ्यासह मुसळधार वृष्टीची शक्यता

भारतीय हवामान खात्याने 16 ते 18 मे दरम्यान जिल्ह्याला चक्रिवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन त्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने काही आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, वाऱ्यासह मुसळधार वृष्टीची शक्यता

जिल्हा आपत्ती निवारण कक्ष – 02362- 228847
टोल फ्री क्रमांक 1077,
पोलीस विभाग नियंत्रण कक्ष – 02362-228614,
जिल्हा रुग्णालय – 02362-228540, 222900,
वैभववाडी तहसिलदार कार्यालय – 02367 – 237239,
कणकवली तहसिलदार कार्यालय – 02367 – 232025,
वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय – 02366- 262053,
मालवण तहसिलदार कार्यालय – 02365-252045,
देवगड तहसिलदार कार्यालय – 02364- 262204,
सावंतवाडी तहसिलदार कार्यालय – 02363-272028,
दोडामार्ग तहसिलदार कार्यालय – 02363- 256518,
कुडाळ तहसिलदार कार्यालय – 02362- 222525,
सावंतवाडी नगरपालिका अग्निशमन दल – 02363- 272044,
वेंगुर्ला नगरपालिका अग्नीशमन दल – 02366 – 262027,
मालवण नगरपालिका अग्नीशमन दल – 02365-252030,
कणकवली नगरपालिका अग्नीशमन दल – 02367-232007,
कुडाळ एम.आय.डी.सी. अग्नीशमन दल – 02362-223178/223278,
दोडामार्ग पोलीस ठाणे – 02363-256650,
सावंतवाडी पोलीस ठाणे – 02363-272066/272260,
वेंगुर्ला पोलीस ठाणे – 02366-263433,
कुडाळ पोलीस ठाणे – 02362-222533,
मालवण पोलीस ठाणे – 02365-253533,
कणकवली पोलीस ठाणे – 2367-232033,
ओरस पोलीस ठाणे – 02362-228888,
देवगड पोलीस ठाणे – 02364-261333,
वैभववाडी पोलीस ठाणे – 02367 – 237133,
निवती पोलीस ठाणे – 02366- 228200,
बांदा पोलीस ठाणे – 02363-270233,
विजयदुर्ग पोलीस ठाणे – 02364-245300

source:abpnews
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: