Cyclone Tauktae: पत्त्यांप्रमाणे कोसळला भलामोठा टॉवर, क्षणात जमीनदोस्त झाल्याचा VIDEO VIRAL

अहमदाबाद 18 मे : तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. सोमवारी रात्री गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यालाही या वादळाचा तडाखा बसला. यावेळी वारा ताशी 185 किलोमीटर वेगाने वाहत होता. तौक्ते हे गेल्या 23 वर्षात गुजरातमध्ये आलेलं सर्वाधिक विनाशकारी चक्रीवादळ आहे. या वादळामुळे महाराष्ट्राच्या कोकण विभागात वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या या वादळाचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. केवळ 9 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आपण हवेचा अंदाज लावू शकतो. डोळ्याची पापणी झाकण्याआधी एक भलामोठा मोबाईल टॉवर पत्त्यांप्रमाणं खाली कोसळल्याचं (Tower Collapsed in Seconds) या व्हिडिओमध्ये दिसतं. व्हिडिओ कोणीतरी आपल्या घराच्या छतावरुन शूट केला आहे. हा व्हिडिओ गिर सोमनाथ जिल्ह्यातील एका शहरातला असल्याचं समोर आलं आहे.

याआधी 9 जून 1998 ला गुजरातमध्ये आलेल्या एका चक्रीवादळात मोठं नुकसान झालं होतं. यात मोठ्या संख्येनं लोकांचा बळी गेला होता. विशेषतःकांडलाच्या बंदरगाह शहराला याचा सर्वाधिक फटका बसला होता. अधिकृत आकडेवारीनुसार या वादळादरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या 1,173 सांगण्यात आली होती. तर, 1,774 जण बेपत्ता होते. मात्र, एका आघाडीच्या माध्यमानं त्यावेळी दावा केला होता, की कमीत कमी 4,000 लोक या घटनेत मृत झाले आहेत. तर, असंख्य लोकं बेपत्ता होते, कारण मृतदेह समुद्रात वाहून गेले होते.

चक्रीवादळामुळे मुंबई मोठा पाऊस झाला तर गुजरातमध्ये दोन लाखाहून अधिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं. मुंबईच्या समुद्री भागात 175 किलोमिटर दूर अंतरावर हीरा ऑयल फील्ड्सजवळ अडकलेलं एक भारतीय जहाज P-305 समुद्रात बुडालं. भारतीय नौदलाने खवळलेल्या समुद्रातून 146 लोकांना सुखरूप वाचवलं. पण अजूनही 170 पेक्षा जास्त लोकं अजून बेपत्ता आहे.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: