क्रिकेट फॅन्सच्या मागणीनंतर डेव्हिड वॉर्नर परतला, शेअर केला भन्नाट VIDEO

सिडनी, 20 मे: डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) आयपीएल स्पर्धेचा (IPL 2021) पूर्वार्ध निराशाजनक ठरला. त्याच्या कॅप्टनसीमध्ये हैदराबादनं सहापैकी पाच मॅच गमावल्या. या निराशाजनक कामगिरीमुळे वॉर्नरची कॅप्टनपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्याचबरोबर त्याची टीममधील जागा गेली. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा अचानक स्थगित झाली. ऑस्ट्रेलियन सरकारनं भारतामधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. त्यामुळे वॉर्नरला अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडूसह मायदेशा जाण्यासाठी मालदीवला वाट पाहवी लागली होती.

ऑस्ट्रेलियन सरकारनं घातलेली बंदी 15 मे रोजी संपली. त्यानंतर वॉर्नर सर्व खेळाडूंसह मायदेशी परतला आहे. मात्र अजूनही त्याला ऑस्ट्रेलियन सरकारच्या नियमाप्रमाणे क्वारंटाईन राहावे लागत आहे. मायदेशी परतल्यानंतर वॉर्नरचा मुड चांगलाच फ्रेश झालेला आहे. त्यामुळेच त्यानं क्रिकेट फॅन्सची मागणी पूर्ण करत एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.

वॉर्नरनं धनूष (Dhanush) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांच्या मारी 2 (Marri 2) या सिनेमातील रावडी बेबी (Rowdy Baby) या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला वॉर्नरनं लोकप्रिय डिमांडसह परत असे कॅप्शन दिले आहे. वॉर्नरच्या फॅन्सना त्याचा हा व्हिडीओ जाम आवडला असून तो चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे.

वॉर्नरला विश्रांती

डेव्हिड वॉर्नर आणि पॅट कमिन्स यांचा वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. या दोघांना कौटुंबिक कारणं तसेच बॉल टेम्परिंग वादामुळे विश्रांती देण्यात आली आहे, असं मानलं जात आहे. बायोबबलच्या वातावरणात सतत क्रिकेट खेळणे अवघड असल्याचे वॉर्नरने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर कॅमेरुन बॅनक्रॉफ्टने केलेल्या आरोपामुळे बॉल टॅम्परिंग प्रकरण तीन वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: