‘माझा शब्द खरा करून दाखवणार’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

रायगड, 20 मे : ‘मी पंढरपूरच्या (Pandharpur) जनतेला शब्द दिला होता या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी माझ्या विधानावर ठाम आहे, पण आता सध्या ही वेळ नाही. आपण कोरोनाशी लढत आहोत, आम्हाला कोरोनाशी (Corona) लढायचं आहे, या सरकारशी लढायचं नाही. ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवेल’, असा विश्वास भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी व्यक्त केला.

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोकणच्या दौऱ्यावर आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

‘रश्मी शुक्ला यांचा जो अहवाल आहे, तो जर बाहेर आला तर या सरकारला तोंड दाखवण्यासाठी जागा उरणार नाही. त्यामुळे हे सरकार न्यायालयात गेले आहे आणि चौकशी करू नये, अशी विनंती करत आहे. हे सरकार त्यांच्याच अंतर्विरोधामुळे पडेल हे मी आधीच सांगितलं होतं, आता त्याची वेळ जवळ येत आहे. त्याकडे वाटचाल आता सरकारची सुरू झाली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

‘पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये अख्खी राष्ट्रवादी उतरली, संपूर्ण प्रशासनाचा गैरवापर करण्यात आला. पण जनतेनं आमच्या उमेदवाराला निवडणूक दिलं. मी पंढरपूरच्या जनतेला शब्द दिला होता या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी माझ्या विधानावर ठाम आहे, पण आता सध्या ही वेळ नाही. आपण कोरोनाशी लढत आहोत, आम्हाला कोरोनाशी लढायचं आहे, या सरकारशी लढायचं नाही. ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवेल’, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘तौक्ते चक्रीवादळामुळे सर्वदूर नुकसान झाले नाही. पण, काही ठिकाणी यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तिथे मदत करण्याची गरज आहे.  निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी राज्य सरकारने जी मदत दिली होती. ती यावेळी अद्यापही दिली नाही. कोल्हापूर, साताऱ्यात महापूर आला होता, त्यावेळी आम्ही तातडीने मदत दिली होती. मी स्वत: जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर मदतीची घोषणा केली. मदतीची घोषणा करण्याआधी माहिती घेऊन घोषणा करण्याची गरज आहे, असंही फडणवीस म्हणाले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचा दौरा केला. गुजरातमध्ये चक्रीवादळ धडकले आणि थांबले. ज्यावेळी चक्रीवादळ एखाद्या भागात धडकते तिथे प्रचंड नुकसान होते. गावाच्या गाव जमीनदोस्त झाली आहे. पंतप्रधानांनी मदतीची घोषणा केली आहे, त्याबरोबर ज्या राज्यात नुकसान झाले आहे, त्यांचा सुद्धा उल्लेख केला आहे. तामिळनाडूने याबद्दल कोणतीही मागणी केली नाही. गोव्यानेही तशी कोणतीही मागणी केली नाही. फक्त महाराष्ट्रातच काही नेते हे स्क्रिप्ट ठरल्याप्रमाणे केंद्रावर आरोप करत आहे. केंद्राने हे दिलं नाही, ते दिलं नाही. जाणीवपूर्वक ते कांगावा करत आहे. त्यांना माहिती असून सुद्धा ते मुद्दामहून दररोज खोट बोलून रेटून बोला, असं कार्यक्रम त्यांचा ठरला आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

‘मराठा आरक्षणाचा कायदा हा आम्ही आणला होता. उच्च न्यायालयात हा विषय गेला होता. पण न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पुन्हा हा निर्णय न्यायालयात गेला आणि त्याला स्थगिती मिळाली आणि आता तो रद्द झाला. या सरकारला मराठा आरक्षणाबद्दल कोणतेही गांभीर्य नाही. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेव्यतिरिक्त कोणतेही काम केले नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

‘महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. राज्यपालांना भेटून एक पत्र देऊन काही होत नाही. एका पानाचे निवेदन दिले आहे, त्यामुळे असा काही फरक पडत नाही. मराठा समाजाची फसवणूक आहे. उलट मोदींनी मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे, या सरकारकडे कोणताच प्रस्ताव नाही, आपल्या अंगावर आलेले काम झटकण्याचा प्रयत्न आहे,  असा टोलाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.

‘कोरोनाच्या काळात केंद्राने सर्वात जास्त मदत महाराष्ट्राला दिली आहे. पण, केंद्राने काही मदत दिली नाही, असा गळा काढण्याचे काम सरकारने केले. सर्वात जास्त 2 कोटी लशी राज्याला देण्यात आल्यात. त्या बळावर सर्वात जास्त लसीकरण राज्यात झाले. मग, त्या लशी काय जमिनीतून आल्या होत्या का? असा सवाल करत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

source:news18
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: