Nagpur News: मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांची हेळसांड; कचरा गाडीतून नेण्यात आला मृतदेह

नागपूर, 22 मे: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Coronavirus) वेगानं पसरत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd Wave) अत्यंत संसर्गजन्य ठरत असून दररोज हजारो नागरिक विषाणूच्या कचाट्यात सापडत आहेत. याचा प्रचंड ताण आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. परिणामी अनेकांना वैद्यकीय सुविधा मिळवण्यात अनेक अडचणी येतं आहेत. तर ऑक्सिजन, बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन यासाठी रुग्णाला आणि रुग्णाच्या नातेवाईकांना प्रचंड ओढाताण करावी लागत आहे.

त्यामुळे कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. अशा स्थितीत कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्यावर सन्मानानं अंत्यविधी केला जात नाही. मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांची होरपळ सुरूच आहे. अशातच नागपूरच्या बुट्टीबोरी याठिकाणी कोविड रुग्णाचा मृतदेह कचरा गाडीतून नेण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. बुट्टीबोरी नगरपरिषदेकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं त्यांनी कोविड रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी कचरा गाडीचा वापर केला आहे.

13 मे रोजी जयराम नेवारे या कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह कचरा गाडीतून नेण्यात आला होता. यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या या गलथान कारभारावर आक्षेप घेतला आहे. आक्षेप नोंदवल्यानंतरही बुट्टीबोरी नगरपालिकेनं कचरा गाडीतून मृतदेहांची वाहतूक सुरूच ठेवली आहे. यावेळी मात्र नागरिकांनी आणि नातेवाईकांनी  नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

त्यांनी प्रशासनाच्या कारभाराव प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थानिकांनी नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चिकळगुंडे यांनी नागरिकांची आणि पीडित परिवाराची माफी मागितली आहे. त्याचबरोबर येथून पुढे असं होणार नाही, असं अश्वासनही दिलं आहे. त्याचबरोबर नगरपालिकेकडे रुग्णवाहिका नसल्याची अडचणही सांगितली.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: