अखेर रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवला, मुंबई पोलिसांनी हैदराबादमध्ये जाऊन केली चौकशी

मुंबई, 25 मे: फोन टॅपिंग प्रकरणी  (phone tapping case) अखेर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.  मुंबई सायबर सेलच्या टीमने (Mumbai police) हैदराबादमधील घरी जाऊन शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. जबाबात शुक्ला यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे फेटाळून लावले आहेत.

चौकशीसाठी टाळाटाळ करणाऱ्या  राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अखेर जबाब नोंदवण्यात आला आहे.  मुंबई हायकोर्टाने रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्याबाबत परवानगी दिली होती. त्यानुसार, हैदराबादला जाऊन मुंबईच्या सायबर पोलिसांनी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे.

मागेही दोन वेळा सायबरकडून चौकशीला हजर राहण्या संदर्भात समन्स शुक्ला यांना बजावण्यात आले होते. पण, दोन्ही वेळा कोरोनाचे कारण देऊन शुक्ला यांनी टाळाटाळ केली होती. एवढंच नाहीतर ईमेल द्वारे प्रश्न पाठवावे, त्याची उत्तरं देते, अशी मागणीही शुक्ला यांनी केली होती.

पोलीस अधिकारी चौकशीला बोलावत असल्यामुळे रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद हायकोर्टात सुद्धा धाव घेतली होती, ‘आपल्याला चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्यामुळे चौकशी अधिकारी आपला छळ करत आहे, असा आरोप रश्मी शुक्ला यांनी केला होता. पण, अखेर आता जबाब नोंदवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

राज्य गुप्तचर विभागाची गोपनीय अहवाल फोडल्या प्रकरणी बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

श्मी शुक्लांवर गंभीर आरोप

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा आरोप केला होता. तसंच त्यांनी एक अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता. एवढंच नाहीतर याचा पुरावा केंद्रीय गृहसचिवांकडे देण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची चौकशी केली असता रश्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लीक झाल्याचे निदर्शनास आले. एवढंच नाहीतर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांची याचा गैरवापर केला.

शुक्ला यांनी रितरस फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती. पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहे, असा आरोप काही मंत्र्यांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल गंभीर आरोप सुद्धा केले. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले होते. त्यानंतर आता शुक्ला यांना चौकशीला सामोरं जावं लागत आहे.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: