
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर चित्रकार असल्याचंही समजतं आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर तिच्या सुंदर चित्रांचे फोटो शेअर केले आहेत. पाहा प्रार्थनाने काढलेली सुंदर चित्रे.

अनेक चित्रपट मालिकांतून प्रेक्षकांचं मन जिंकणारी प्रार्थना आता हाताच्या कलेतूनही चाहत्यांचं मन जिंकत आहे.

लॉकडाउनच्या वेळेचा सदुपयोग करत प्रार्थना सुंदर चित्रे रेखाटत आहे.

सुंदर निसर्ग चित्र प्रार्थनाने रेखाटलं आहे.

सुंदर फुलांचे चित्र तिने काढलं आहे. तिच्या चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुकही केलं आहे.

आणखी एक निसर्ग चित्र रेखाटत तिने स्वतःचं नाव देखिल खाली लिहीलं आहे.

‘ती आणि ती’ या चित्रपटानंतर प्रार्थना चित्रपटात दिसली नाही. पण लवकरच एका नव्या चित्रपटात ती दिसणार आहे.

सुंदर ब्लॅक अँड व्हाईट चित्र तिने रेखाटलं आहे.

विशेष म्हणजे प्रार्थनाची ही चित्र तिचे चाहते विकतही घेऊ शकतात. त्यासाठी तिने संपर्क क्रमांकही दिला आहे.

प्रार्थनाच्या या चित्रांवर तिच्या चाहत्यांनी तिला अनेक कमेंट्स दिल्या आहेत.

प्रार्थना ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंगही आहे.
source:news18
0Shares