Shikshaaabhiyan.org ही वेबसाईट बनावट; राज्य शासनाचा खुलासा, मुंबईत मरिन लाईन्स पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई : तुम्हीही शिक्षक भरतीसाठी अर्ज करणार असाल तर वेळीच सावध व्हा. शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सतर्क करणारी बातमी हाती आली आहे. shikshaaabhiyan.org या वेबसाईटवरुन तुम्ही शिक्षक किंवा इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज केला असेल तर यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. Shikshaaabhiyan.org  ही वेबसाईट बनावट असून त्याचा शासनाशी काहीही संबंध नाही, असा खुलासा राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या वेबसाईटपासून सावध राहण्याचं आवाहनही शासनानाच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे यासंदर्भात मुंबईतील मरिन लाईन्स पोलीस स्थानकात राज्य शासनानं तक्रारही दाखल केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून Shikshaaabhiyan.org ही वेबसाईट कार्यरत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होते. या वेबसाईटवर वेगवेगळ्या पदांसाठी म्हणजेच, सर्व शिक्षा अभियान भरती 2021 या मथळ्याखाळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी, त्याचप्रमाणे यासंदर्भातील शिक्षक भरतीमधील इतर पदांसाठी जाहीरात देण्यात आली होती. तसेच या वेबसाईटवर अनेक शिक्षकांनी अर्ज केले असून या वेबसाईटच्या माध्यमातून यासंदर्भात भरती केली जात असल्याचं समोर आलं होतं. तसेच यासंदर्भात सर्व माहिती शिक्षण विभागाला मिळाली. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या वतीनं खुलासा करण्यात आला.

Shikshaaabhiyan.org  ही वेबसाईट आणि राज्य शासनाचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा शिक्षण विभागाच्या वतीनं अधिकृतपणे करण्यात आला. ही वेबसाईट बनावट आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती सध्या सुरु नाही, असंही शिक्षण विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. तसेच जे उमेदवार नोकरीसाठी इच्छुक आहेत, त्यांनीदेखील या वेबसाईटवर अर्ज करु नये, असं आवाहनही शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना करुन सतर्क करण्यात आलं आहे.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: