बाहेर लोकांना उपदेश अन् घरी पत्नीला अमानुष मारहाण, बुवाच्या राक्षसी अवताराचा VIDEO आला समोर

ठाणे 07 जून : सोशल मीडियाचा (Social Media) वापर आजकाल प्रचंड वाढला आहे. सोशल मीडियाचे काही तोटे असले तरी याचे बरेच फायदेही आहेत. सोशल मीडियानं अनेकांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. तर, अनेक अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचं कामही सोशल मीडिया करत असतो. सोशल मीडियावर अनेकदा थक्क करणारे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. स्वतःला बुवा किंवा महाराज समजणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. हे व्यक्ती जवळपास दररोज लोकांना उपदेश करत किंवा कसं वागावं, काय करावं हे सांगत फिरत असतात. मात्र, स्वतः हे सगळं किती आचरणात आणतात? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यावर पडतो.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ कल्याण तालुक्यातील द्वारली या गावातील आहे. या गावातील स्वतःला बुवा आणि महाराज समजणाऱ्या गजानन चिकणकर यानं आपल्या पत्नीला जबर मारहाण केली आहे. या व्यक्तीला दोन बायका असून तो भक्तांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत प्रबोधन करत असतो. मात्र, पहिली पत्नी वयस्कर असल्यानं त्या काम करत नसल्यानं तो अनेकदा पत्नीला मारहाण करतो. हा व्हिडिओ नातवानेच व्हायरल केला आहे. हा व्यक्ती आपल्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करत असताना आजबाजूला इतरही अनेक महिला आहेत, मात्र कोणीही या महिलेच्या मदतीला धावलं नाही. हा व्यक्ती महिलेला वारंवार परत असं करशील का? असा सवाल करत मारहाण करत आहे. त्यानं महिलेला लाथेनं मारण्यासोबतच हातात बादली घेऊनही मारहाण केली आहे.

इतक्यावरच हा व्यक्ती थांबला नाही तर त्यानं महिलेला हाताला धरुन ओढत भिंतीवर आदळलं आणि तिला घरातून बाहेर काढण्यासाठी तो ओढत असल्याचंही यात दिसत आहे. यात तिच्या हातालाही दुखापत झाली आहे. व्हिडिओमध्ये ही महिला वयस्कर असल्याचं दिसत आहे. मात्र, तिला झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर काही कारवाई होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: