मान्सून दाखल, मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान

मुंबई, 09 जून: मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) ला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अजूनही हा पाऊस मुंबईच्या अनेक भागात सुरु आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरं (Suburban) म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस पडतोय. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार (Heavy Rainfall) सरी कोसळत आहेत.

मुंबई शहर परिसरात आज सकाळी 7 ते 8 एका तासात 33 एमएम पाऊस पडला आहे. पूर्व उपनगरात 25 एम एम तर पश्चिम उपनगरात तुरळक पाऊस पडला आहे. समुद्राला 11.43 वाजता 4.16 मीटर उंच भरती येणार आहे. त्यावेळी मुंबईत अतिमुसळधार पाऊस सुरूच राहिला तर शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई आणि उपनगात पावसाने खरोखरंच हजेरी लावली. मुंबई, उपनगर, ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पनवेल (Panvel) या विभागांमध्ये पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली.

ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागात पहाटे पासून रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. येत्या 4 दिवस कोकण, ठाणे आणि इतर जिल्ह्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका आणि पालिक प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वसई विरारसह ग्रामीण भागातील आणि किनारपट्टीच्या गावातील सर्व लोकांना तलाठी, सर्कल ऑफिसरमार्फत अलर्ट केलं आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली तर शाळा , सार्वजनिक इमारत या ठिकाणी पूरग्रस्त लोंकाची सोय करण्यात आली आहे.

रेल्वेकडून अलर्ट जारी

मुंबईत मुसळधार पाऊस दाखल होताच रेल्वेनं सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व मदत गाड्या आणि कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. जोरदार पावसामुळे रुळावर पाणी साचण्याची परिस्थिती उद्भवल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी आणि स्थानिक सेवा सुरळीत चालविण्यासाठी सतर्क राहण्यास सांगण्यात आले.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: