ठाण्यात पावसाचं धुमशान, अनेक ठिकाणी जुनी झाडं कोसळली

ठाणे, 12 जून: ठाण्यात (Thane) मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं ( waterlogging) आहे. सलग तीन दिवसापासून पावसानं ठाण्याला झोडपून काढलं आहे. काल रात्रीपासून पावसाने अधिकच जोर धरला असून अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यात (Thane City Rain Updates) पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

या जोरदार पावसामुळे ठाण्यात शेकडो वर्ष जुने झाडे पडल्याची घटना घडल्या आहे. ठाणे महापौर बंगल्यातील शेकडो वर्ष जुनं झाड पडलं.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, कोकण परिसरात पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे. येत्या काही तासात मुंबईसह ठाण्यात पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईतही पावसाचा जोर वाढला

मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दृष्यमानता कमी झाल्याने समोरचं दिसण्यास अडथळा येत आहे. भरतीलाही सुरुवात झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. वसई-विरार मध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली असून नालासोपारा विरार वसई या ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.

नवी मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. सकाळी 9 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अजून पावसाचा वेग कायम आहे.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: