VIDEO: टोळीचा दिवसाढवळ्या दुकानदारावर गोळीबार, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

जयपूर 15 जून: गोळीबाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता असंच आणखी एक प्रकरण समोर आलं असून यात 6 जणांनी दिवसाढवळ्या गोळीबार केल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की दोन दुचाकींवर आलेले 6 युवक आधी गोळीबार करतात (6 Men Fired Bullets on Fruit Shop Owner) आणि नंतर आपल्या गाडीवर बसून तिथून निघून जातात. एका गाडीवर तिघे बसल्याचं यात पाहायला मिळतं. या व्यक्तींनी एका भाजीपाला आणि फळाच्या दुकानदारावर हा गोळीबार केला आहे. मात्र, सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोळीबार झाला तेव्हा हा दुकानदारही दुकानाच्या आतच होता.

पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू आहे. गोळीबार करणाऱ्या युवकांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. पोलिसांनी सांगितलं, की ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्याचं नाव कैलाश मीणा असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता तीन हल्लेखोर मीणा यांच्या दुकानाबाहेर आले आणि त्यांना हाक मारली. यानंतर मीणा बाहेर आले. याच दरम्यान युवकांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली, मात्र यातून ते बचावले.

बराच वेळ गोळीबार करुनही कैलास मीणा बचावले असल्याचं पाहातच सगळे हल्लेखोर आपल्या गाड्यांवर बसून इथून फरार झाले. कैलाश मीणा हे फळं, भाजीपाला आणि धान्याची कमिशन एजंट म्हणून खरेदी आणि विक्री करतात. त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांची कोणत्याही व्यक्तीसोबत भांडणं किंवा दुश्मनी नाही. इतकंच नाही तर गोळीबार केलेल्यापैकी कोणत्याच व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप या हल्ल्याचा उद्देश आणि नेमकं कारण समोर येऊ शकलेलं नाही.

source:news18
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: