Petrol Price Today: इंधनाचा भडका! परभणीत पेट्रोल 105 रुपये प्रति लीटरच्या पार

नवी दिल्ली, 17 जून: सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol Price Today) आज काहीसा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमतीत गेले काही दिवस सातत्याने वाढ होत आहे, दरम्यान आज या वाढीस काहीसा ब्रेक लागला आहे. इंधनाच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. असं असलं तरीही देशातील अनेक शहरात पेट्रोलचे भाव 105 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहेत. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती काहीशा कमी झाल्या, ज्यामुळे आज इंधनाच्या किंमतीत वाढ झाली नाही आहे. गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत.

मे महिन्यापासून सतत किंमती वाढत असल्यामुळे गेल्या 26 दिवसात पेट्रोलचे दर 6.34 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर या 26 दिवसात 6.63 रुपये प्रति लीटरने वाढले आहेत. महाराष्ट्रात परभणीमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक असतात. आज याठिकाणी पेट्रोल 105.16 रुपये आणि डिझेल  95.63 रुपये प्रति लीटर आहे.

आज होणार महत्त्वाची बैठक

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीसंदर्भात संसदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ही बैठक पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस प्रकरणांबाबत होणार आहे. समितीने पेट्रोलियम मंत्रालय आणि IOC, BPCL आणि HPCL च्या अधिकाऱ्यांना बैठकीकरता बोलावलं आहे. बैठकीमध्ये सध्याचे दर आणि मार्केटिंग संदर्भात चर्चा केली जाईल. नॅचरल गॅसच्या सध्याच्या प्राइसिंग-मार्केटिं मुद्द्यावर देखील माहिती घेतली जाणार आहे. शिवाय बैठकीमध्ये GAIL च्या अधिकाऱ्यांना देखील बोलावण्यात आले आहे.

महत्त्वाच्या शहरातील इंधनाचे भाव (Petrol-Diesel Price on 17th June)

> दिल्लीमध्ये पेट्रोल 96.66 रुपये आणि डिझेल 87.41 रुपये प्रति लीटर

> मुंबईमध्ये पेट्रोल 102.85 रुपये आणि डिझेल 94.84 रुपये

> कोलकातामध्ये पेट्रोल 96.58 रुपये आणि डिझेल 90.25 रुपये

> चेन्नईमध्ये पेट्रोल की कीमत 97.91 रुपये आणि डिझेल 92.04 रुपये पर

> श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 107.79 रुपये आणि डिझेल 100.51 रुपये प्रति लीटर

> रीवामध्ये पेट्रोल 107.07 रुपये आणि डिझेल 98.10 रुपये प्रति लीटर

> भोपाळमध्ये पेट्रोल 104.85 रुपये आणि डिझेल 96.05 रुपये प्रति लीटर

> परभणीमध्ये पेट्रोल 105.16 रुपये आणि डिझेल 95.63 रुपये प्रति लीटर

> हैदराबादमध्ये पेट्रोल 100.46 रुपये आणि डिझेल 95.28 रुपये प्रति लीटर

> जयपूरमध्ये पेट्रोल 103.29 रुपये आणि डिझेल 96.38 रुपये प्रति लीटर

दररोज 6 वाजता बदलते पेट्रोल-डिझेलची किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

कसे तपासाल पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: