दीपिका पदुकोणने रणबीर कपूरसोबत या कारणासाठी घेतला होता ब्रेकअपचा निर्णय, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई : बॉलिवूडच्या अनेक खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी दुर्दैवाने संपल्या. त्यात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच नाव आधी घेतलं जातं. त्यांच्या नात्याला घेवून चाहते जेवढे उत्सुक होते  तेवढंच हे नातं संपल्यावर चाहते नाराजही झाले होते.  रणबीर-दीपिकाचे ब्रेकअप नक्की का झालं याचबरोबर हे दोघं कसे जवळ आले या बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

‘बचना-ए-हसीनो’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोघं जवळ आले होते पण चित्रपट सुरू होण्याआधीच त्यांची भेट झाली होती. रणबीरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा त्याने दीपिकाला पहिल्यांदा पाहिलं ते म्हणजे मुंबईतील एका चित्रपट स्टुडिओमध्ये, ओम शांती ओम या तिच्या पहिल्या चित्रपटाचं ती शूटिंग करत होती. शूटिंगच्या ब्रेकमध्ये दीपिका तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जात होती आणि त्यानंतर रणबीरही त्याचा पहिल्या चित्रपट सावरियाच्या शूटिंगनंतर ब्रेकमध्ये बाहेर उभा होता.

रणबीरची नजर दीपिकावर पडली पण दीपिकाने त्याची दखल घेतली नाही. यानंतर रणबीरला दीपिकाचा फोन नंबर सापडला आणि त्याच दिवशी तिला फोन केला. यानंतर, जेव्हा दोघांनी बचना-ए-हसीना सिनेमाचं एकत्र शूट केलं, तेव्हा त्यांची जवळीक वाढली आणि ते रिलेशनशिपमध्ये आले.

Here's how Ranbir Kapoor and Deepika Padukone met for the first time | Filmfare.com

दोघांच नातं जवळजवळ दोन वर्षे चाललं, पण नंतर त्यांच्यात दुरावा आला. रणबीरची कतरिना कैफसोबत जावळीकता वाढली. राजनिती चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान. रणबीरची कतरिना कैफसोबत जवळीक वाढली. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीरने कतरिनासाठी दीपिकाची फसवणूक केली. दीपिकाने स्वत: हे एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिने रणबीरला रंगेहाथ पकडलं आहे, त्यानंतर तिने त्याच्याशी असलेले संबंध कायमचे तोडणं योग्य मानले. अशाप्रकारे, हे नाते प्रेमापासून सुरू झाले आणि फसवणुकीवर संपलं.

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: