बाळाचा चेहरा पाहून वडिलांनी दिली थेट जीवे मारण्याची धमकी

मुंबई : ईस्ट आफ्रिकामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर वडिलांनी त्या बाळाला मारण्याचा फर्मान काढला. याचं कारण म्हणजे या महिलेने विचित्र दिसणाऱ्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाला पाहून काही लोकं त्याला एलिअन असं म्हणतात, तर काहींनी त्याला सैतान असं नाव दिलं आहे. या बाळाच्या दिसण्यामुळे त्याला वडिलांनी देखील स्विकार केलं नाही.

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुलाच्या वडिलांनी जन्माला येताच त्याला स्वीकारण्यास नकार दिला. एवढंच नाही तर त्याने मुलाला ठार मारण्याचे आदेशही दिले होते. पण रवांडाच्या बाजेनेझा लिबर्टाला हे मान्य नव्हतं, त्यानंतर त्या महिलेला तिचा पती आणि कुटुंबाने तिला एकटं सोडलं. महिलेच्या पतीने तिला सांगितलं की, जर तिला कुटुंबासोबत राहायचं असेल तर तिला मुलाला सोडून द्यावं लागेल.

Father tells wife to kill

बाजेनेजाला तिच्या सासरच्या मंडळींनी आणि पतीने सोडून दिलं आहे. यामुळे, तिला मुलाचं संगोपन करताना खूप अडचणी येत आहेत. एका मुलाखतीत बाजेनेजाने सांगितले की, तिला अजून मुलं आहेत, परंतु इतर सर्व मुलं सामान्य आहेत.

या मुलाला पाहून प्रत्येक जण त्याची मस्करी करतं. गावकऱ्यांनी देखील मुलावर आणि त्याच्या आईवर बहिष्कार टाकला. या मुलाची नेमकी परिस्थिती डॉक्टर देखील सांगू शकत नाहीत. बाजेनेजाने सांगितलं की, मुलाला खूप वेदना होतात. आता ती तिच्या मुलाच्या उपचारासाठी ऑनलाईन लोकांची मदत घेतेय. यासाठी तिनी ऑनलाईन अकाऊंटही सुरू केलं आहे.

source:zeenews
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: