राज्यातील नाट्यगृह आणखी दोन महिने बंदच राहणार…

राज्यातील नाट्यगृह आणखी दोन महिने बंदच राहणार…

मुंबई : सरकारने नाट्यगृहं आणि चित्रपटगृह सुरु करण्याची  परवानगी देण्यासाठी काहिदिवसांपूर्वी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात नटराजाची महाआरती करण्यात आली. सरकारला जागं करण्यासाठी जागर आणि गोंधळाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारने नाट्यगृहं आणि चित्रपटगृह सुरु करण्यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र आता नाट्यप्रेमींसाठी आणि कलाकारांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे दोन महिन्यांत नाट्यगृह सुरु होणार आहेत.

आज दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री श्री. उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्यासाठी भेट घेण्यात आली होती. या चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष: नवनाथ मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते: मंगेश कदम मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघ अध्यक्ष: संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटना अध्यक्ष: किशोर वेल्ले, विजय केंकरे, चित्रपट प्रतिनिधी: विजय राणे,  आणि ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणारे श्री. आदेश बांदेकर , श्री. सुबोध भावे.

या सगळ्यांच्या उपस्थितीत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो असा की नाट्यगृह ५०% प्रेक्षक उपस्थितीमध्ये जागतिक रंगभूमी दिनी ५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू करण्याचे आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आले. त्यामुळे आता प्रेकक्षकांना आणि कलाकारां दोन महिने अजून वाट पाहावी लगणार आहे.

source:zeenews
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: