महाराष्ट्राला हादवणारी घटना! अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन सामुहिक बलात्कार

महाराष्ट्राला हादवणारी घटना! अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन सामुहिक बलात्कार

पुणे : महाराष्ट्राला हादरवणारी एक संतापजवक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या घटनेमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणवीर आला आहे.

नेमकी घटना काय घडली?

बाहेरगावाहून येणाऱ्या मित्राला आणण्यासाठी 14 वर्षांची अल्पवयीन मुलगी रेल्वे स्टेशनवर आली होती. यावेळी एकटी मुलगी पाहून रिक्षावाल्याने तिचं अपहण केलं. तिला एका खोलीत नेण्यात आलं. तिथे तिच्यावर आठ जणांनी बलात्कार केला. त्यामध्ये सहा रिक्षाचालक आणि दोन जण रेल्वेमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

31 ऑगस्टला ही घटना घडल्याची माहिती पीडिते मुलीने पोलिसांनी दिली. याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करत आठ आरोपींना अटक केली आहे. आज या सर्व आरोपींना कोर्टात हजर केलं असताना त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीडित मुलीला रूग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची तब्येत स्थिर असल्याची माहिती वानवडी पोलिसानी दिली आहे.

source:zeenews
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: