Sidharth Shukla death: सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची आई जे म्हणाली ते ऐकून अंगावर येतील शहारे

मुंबई : सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने 2 सप्टेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. चाहत्यांनी त्यांचा आवडता अभिनेता गमावला पण एका आईने तिच्या पोटचा गोळा गमावला आहे. सिद्धार्थच्या अशा अचानक जाण्यामुळे सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. दरम्यान 6 सप्टेंबर रोजी सिद्धार्थसाठी झूमवर व्हर्चुअल प्रेयर मीट ठेवली होती. या मीटचं आयोजन ब्रह्मकुमारी सिस्टर्सद्वारे करण्यात आलं. यावेळी ब्रह्मकुमारी सिस्टर शिवानी यांनी सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची आईची काय परिस्थितीची माहिती दिली.

ब्रह्मकुमारी सिस्टर शिवानी यांनी सांगितलं, ‘2 सप्टेंबर रोजी जेव्हा रीता बहेन (सिद्धार्थची आई) यांचा फोन आला. तेव्हा त्या फक्त ओम शांती म्हणाल्या… त्या ओम शांतीमध्ये स्थिरता होती… शक्ती होती… मी विचार केला देवा ही अशी कोणती शक्ती आहे… जी या आईच्या तोंडून निघत आहे.’  कोणाच्याही डोळ्यातून आपसूक पाणी आल्या शिवाय राहणार नाही.

पुढे शिवानी म्हणाल्या, ‘मी पुन्हा त्यांना ठिक आहात ना? असं विचारलं. त्या म्हणाल्या माझ्याकडे परमात्म्याची शक्ती आहे. माझा फक्त एकचं संकल्प आहे.. तो आनंदी राहिल जेथेही असेल…’ हा भावूक व्हिडिओ पारस छाबडाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या

व्हिडिओ शेअर करत पारसने कॅप्शनमध्ये, ‘रीता काही तुम्हाला अणखी शक्ती मिळायला हवी. हे ऐकल्यानंतर मला देखील शक्ती मिळेल. सत्संगसाठी खुप धन्यवाद…’ असं लिहिलं आहे. सिद्धार्थच्या निधनाने सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. आता सर्वचं या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: