अक्षय कुमारवर दु:खाचा डोंगर… आईचं निधन

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या आईचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आईच्या निधनाची बातमी खुद्द अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे. शिवाय अक्षयने आईसाठी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. ‘ती माझ्यासाठी सर्व काही होती. आज मी मोठ्या दुःखात आहे. माझी आई अरूणा भाटीया यांचं निधन झालं आहे….’ असं लिहित अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अक्षयच्या आईला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आईला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याचं कळताच अक्षय कुमारनं सर्व कामं, चित्रीकरण अर्ध्यावर सोडत तडक मायदेश गाठला.

अक्षय भारतात तातडीनं आल्यानंतर तो येण्यामागचं कारण चाहत्यांपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर लगेचच सर्वांनी त्याच्या कुटुंबाच्या चांगल्यासाठी प्रार्थना सुरु केल्या. आईच्या निधनाची बातमी कळवत त्याने चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: