त्या जाहिरातीमध्ये काम करणं वरूण पडलं महागात; युझर्सने सुनावले खडेबोल

मुंबई : अभिनेता वरूण धवनच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर कायम त्याच्या फोटो आणि व्हिडिओची चर्चा असते. पण अनेक मुलींच्या गळ्याती ताईद असलेला वरूण आता एका जाहिरातीमुळे अडचणीत आला आहे. सध्या अंतरवस्त्राच्या एका जाहिरातीमुळे तो चर्चेत आला आहे. ऐकीकडे अमूल माचो कंपनीने त्याच्या जाहिरातीला कॉपी म्हटले आहे. दुसरीकडे, युझर्सने या जाहिरातीवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला. एकंदर लक्स कोझीची जाहिरात पाहिल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत.

वरूणच्या जाहिरातीचा विरोध करत एक युझर म्हणाला, ‘जर एका महिलेने अंतरवस्त्रांवर जाहिरात चित्रीत केली असती तर, सर्वांनी त्याचा विरोध केला असता.’ दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘या लोकांना सर्वत्र अश्लीलता पसरवायला लाज वाटत नाही.’ तर काहींनी वरूणला ओव्हरऍक्टिंगचं दुकान असं देखील म्हटलं आहे. सध्या वरूणच्या जाहिरातीची सर्वत्र चर्चा आहे.

अमूल माचो कंपनीने जाहिरातीविरोधात आपली तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत असेही म्हटले आहे की ही जाहिरात अमूलच्या जाहिरात ज्याप्रमाणे चित्रित करण्यात आली होती त्याच प्रकारे चित्रित करण्यात आली आहे.

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: