तुफानी प्रेमाची कबुली देत अभिनेत्याकडून चाहत्यांना धक्का

मुंबई : सोशल मीडियावर अभिनेता विद्युत जामवाल आणि नंदिता माहतानी यांचे फोटो व्हायरल झाले आणि पाहता पाहता या जोडीच्या नात्याला वेगळं वळण मिळाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यामागचं कारणही तसच होतं. विदयुत  आणि नंदितानं त्यांच्या नात्याची नवी सुरुवात केली तिसुद्धा प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या ताजमहालाच्या साक्षीनं.

खुद्द विद्युतनंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नंदितासोबतचा फोटो शेअर केला. यामध्ये एका फोटोमध्ये तो आणि नंदिता पाठमोरे ताजमहालकडे पाहताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे ही जोडी वॉल क्लाईंबिंग करताना दिसत आहे. विद्युतनं भींत चढतानाचा एक फोटोही पोस्ट केला. या फोटोंमध्ये तो आणि नंदिता भींतीवर चढताना आयुष्यात भन्नाट तुफानी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी विद्युतला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.

कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी विद्युत आणि नंदिलाताला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. मागच्या काही दिवसांपासून नंदिता आणि विद्युत यांच्या नात्याबाबत बरीच चर्चा होत होती.सोशल मीडियावर या जोडीला मिळणारी लोकप्रियता आणि त्यानंतर त्यांनी नात्याला दिलेली कबुली कोणा एका प्रेमकथेहून कमी वाटत नव्हती. फक्त ही प्रेमकहाणी जरा वेगळी आणि थरारक आहे असं म्हणायला हरकत नाही.

source:zeenews
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: