बाबो… रणवीर – दीपिकानं अलिबागमध्ये जे केलंय ते पाहून बसेल धक्का

बाबो… रणवीर – दीपिकानं अलिबागमध्ये जे केलंय ते पाहून बसेल धक्का

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी, अभिनेत्री दीपिका पदुकोण (Ranveer singh Deepika Padukone) त्यांच्या कामामध्ये बरेच व्यग्र असल्याचं पाहायला मिळतं. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मिळालेली उसंत वगळली तर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या जोमानं चित्रीकरणांमध्ये रुजू झाली आहे. यादरम्यानच इतरही काही गोष्टींकडे दीप-वीर लक्ष देताना दिसत आहेत.

मुंबईत राहून इथंच आपलं नान कमवणाऱ्या या जोडीने सध्य़ा या मायानगरीला नव्हे, तर या शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या अलिबागला पसंती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या जोडीनं किनारपट्टी भागात असणाऱ्या अलिबाग येथे भूखंड खरेदी केला आहे.

सोमवारीच दीपिका आणि रणवीर या दोघांनीही मुंबईहून अलिबागला जात येथील स्थानिक रजिस्ट्रार ऑफिसला भेट दिली. जिथं त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीची नोंदणी केली.

चाहते आणि सदर कार्यालयाबाहेर असणाऱ्या मंडळींनी रणवीर आणि दीपिकाला पाहताच त्यांच्याभोवती गर्दी करण्यास सुरुवात केली.

सूत्रांच्य़ा माहितीनुसार दीपिका आणि रणवीरने अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे असणाऱ्या जवळपास 90 गुंठे जमिनीची खरेदी केली आहे. यासाठी त्य़ांनी एक- दोन नव्हे तर तब्बल 22 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम मोजली आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबागला अनेक सेलिब्रिटींनी पसंती दिली आहे. त्यातच आता रणवीर आणि दीपिकाचं नावही जोडलं गेलं आहे. थोडक्यात रणवीर आणि दीपिकाही आता पक्के अलिबागकर झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही.

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: