‘Taarak Mehta…’ फेम अभिनेत्याच्या कारला अपघात; निपचीत पडलेलं शरीर

मुंबई : गेल्या 13 वर्षापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.  एवढंच नाही तर मालिकेची स्टारकास्ट कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. मालिकेची स्टारकास्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मालिकेतील एका अभिनेत्याचा अपघात झाला आहे.

‘आयुष्मान भव’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ स्टारर अभिनेता प्रशांत बजाजच्या कारचा अपघात झाला आहे. नुकताचं मुंबईच्या एमटीएनएल जंक्शनवर त्याच्या कारचा अपघात झाला. परंतू प्रशांत या अपघातातून बचावला आहे. प्रशांतच्या कारला धडक देणाऱ्या रिक्षाच्या चालकाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

प्रशांत म्हणाला, ‘अपघातातून वाचलो त्यासाठी मी देवाचे आभार मानू शकत नाही. मला वाटलं की मी माझा पाय गमावला आहे. मी सुन्न होतो पण नंतर लोक तिथे होते. त्यांच्यामुळे मी सुखरूप घरी येऊ शकलो…’  प्रशांतच्या कारला धडक देणाऱ्या रिक्षाचालकाची प्रकृती देखील स्थिर आहे.

source:zeenews
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: