‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी अरुधंतीला सर्वाधिक मानधन

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी मालिका ठरली. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. मालिकेमुळे प्रत्येकाला नवी ओळख मिळाली.  सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये चांगली कमाई करतात.

बऱ्याचदा करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणाऱ्या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. असचं काहीस आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील कलाकारांसोबत घडलं आहे.

ही मालिका टीआरपी शर्यतीत अव्वल क्रमांकावर असते. दिवसेंदिवस येणाऱ्या रंजक वळणामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत. कलाकारांची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत जात आहे.

जितकी कलाकाराची लोकप्रियता अधिक तितके तगडे मानधन कालाकार घेतात. सोशल मीडियावरील चर्चेनुसार अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला या मालिकेसाठी प्रत्येक एपिसोड 25 हजार रुपये इतके मानधन घेतात.

तर संजना भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेला 17 हजार रुपये इतके मानधन एका भागासाठी  मिळते. अनिरुद्ध म्हणजे मिलिंद गवळीलाही प्रत्येक भागासाठी 20 हजार इतके मानधन मिळते. तर अनिरुद्ध म्हणजे मिलिंद गवळी यांनाही प्रत्येक भागासाठी 20 हजार इतके मानधन मिळते.

मालिकेतले कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतात. आपले फोटो आणि व्हिडीओ ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात.  मालिकेच्या येणाऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांन मध्ये नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते.

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: