जेव्हा परदेशी होस्टने उडवली भारतीय संस्कृतीची खिल्ली; ऐश्वर्यान दिलं कडक उत्तर

मुंबई : भारताला संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे भारतीय नागरिक परदेशात गेला तरी तो भारतील संस्कृतीचे मूल्य परदेशात जपत असतो. भारताच्या संस्कृतीची चर्चा संपूर्ण जगात आहे. काही वेळा परदेशात भारतीय संस्कृतीची खिल्ली उडविली जाते. असंच काही अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबत देखील झालं आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक  व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक परदेशी होस्ट भारतीय संस्कतीची खिल्ली उडवताना दिसत आहे.

पण भारतीय संस्कृतीची खिल्ली उडविणाऱ्या त्या परदेशी होस्टला ऐश्वर्याने असं कडक उत्तर दिलं ज्यामुळे तो होस्ट काही क्षणासाठी शांत झाला. एका अंतरराष्ट्रीय चॅट शोमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय पोहोचली होती. शोच्या होस्टची जबाबदारी डेवीड लेटरनमॅन यांच्या खांद्यावर होती. शोमध्ये डेवीडने ऐश्वर्याला अनेक प्रश्न विचारले. पण एका प्रश्नात त्याने भारताच्या संस्कृती खिल्ली उडविली.

डेवीडने ऐश्वर्याला विचारलं, ‘ही गोष्ट खरी आहे भारतात आज ही मुलं त्यांच्या आई-वडिलांसोबत राहतात.’ यावर ऐश्वर्याने होकार दिला. त्यानंतर डेवीड म्हणाला, ‘वयात आल्यानंतर देखील भारतात मुलं त्यांच्या आई-वडिलांसोबत राहतात?’ डेविडचं असं बोलणं ऐकून जमलेले हसू लागले. तेव्हा विचार करत ऐश्वर्या रागात हसणाऱ्यांना कडक उत्तर दिलं.

ऐश्वर्या म्हणाली, ‘हो भारतात आजही मुलं त्यांच्या आई-वडिलांसोबत राहतात. कारण आम्हाला एकत्र जेवण करण्यासाठी आई-वडिलांची अपॉइंटमेन्ट घ्यावी लागत नाही… ‘ ऐश्वर्याचं हे सडेतोड  उत्तर ऐकताचं काही क्षणासाठी होस्ट डेवीड गप्पा झाला. ऐश्वर्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

source:zeenews
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: