बाहेरची सोडा…घरातील हवा आहे जास्त प्रदूषित!

मुंबई : बाहेरच्या प्रदूषित हवेत जाण्यापेक्षा अनेकदा आपण घरात राहणं पसंत करतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का बाहेरच्या हवेपेक्षा तुमच्या घरातील हवा जास्त प्रदूषित आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, घरातील वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात सुमारे 40 लाख मृत्यू होत असतात.

गेल्या काही दिवसांत संशोधनातून असं समजलंय की, घरं किंवा इतर इमारतींच्या आतील भागातील हवा ही बाहेरच्या हवेच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रदूषित असू शकते.

अमेरिकेत पर्यावरण संरक्षण यंत्रणेच्या अहवालानुसार, बाहेरच्या तुलनेत घरातल्या प्रदूषणाचा स्तर दोन ते पाच पट तर कधी कधी 100 पटही जास्त असू शकतो. अनेकजण त्यांचा जवळपास 90 टक्के वेळ घरातच घालवतात. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे, घरातल्या वायुप्रदूषणामुळे सर्दी, तसंच श्वास घ्यायला त्रास आदी लक्षणं जाणवू शकतात. नाक, डोळे, घशात जळजळ, वारंवार डोकेदुखी, थकवा, चक्कर येणं अशी लक्षणंही या प्रदूषामुळे दिसू शकतात.

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: