IPL 2021: कॅप्टन कूल धोनीनंतर CSK ची मदार कोणाच्या खांद्यावर?

मुंबई: विराट कोहलीने नुकताच टीम इंडियाचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर आता टीम इंडियाचं कर्णधारपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू आहे. याच सगळ्या प्रकारा दरम्यान अजून एक बातमी समोर येत आहे. चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा यंदा शेवटचं आयपीएल असणार आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.

यंदाचं IPL खरंच धोनीसाठी शेवटचं असेल तर चेन्नईची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार असा प्रश्न सर्वांना आहे. याच दरम्यान एक ट्वीट व्हायरल झालं आहे. या ट्वीटमुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

CSK फॅन आर्मी नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरून धोनीनंतर कोण कर्णधार होणार असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी रविंद्र जडेजाचं नाव घेतलं. अनेकांनी या बद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

फॅनच्या या प्रश्नावर रवींद्र जडेजानेही उत्तर दिलं आहे. रविंद्र जडेजानं 8 असा आकडा लिहिला आहे. रविंद्र जडेजाच्या जर्सीचा क्रमांक 8 आहे. त्यामुळे जडेजाकडे CSKचं कर्णधारपद येणार का? याची उत्सुकता चाहत्यांना आहे.  जडेजाने अप्रत्यक्षपणे सांगितले की तो CSK चा पुढील कर्णधार असेल. चाहत्यांनी याबद्दल खूप कमेंट करण्यास सुरुवात केली तेव्हा जडेजाने त्याचे ट्विट डिलीट केलं.

source:zeenews
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: