गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आई-वडिलांसोबत फोटो व्हायरल; म्हणाला…

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक 2020 चा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र, यावेळी याचे कारण त्याचा खेळ नसून सोशल मीडियावरील त्याची एक पोस्ट आहे. या पोस्टमध्ये नीरजने त्याच्या आई-वडिलांसोबत एक फोटो शेअर केला आहे, हा फोटो फ्लाइटमधील असल्याचे दिसत आहे.

नीरजने त्याच्या आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, आज त्याने आपल्या आई -वडिलांना विमानात बसवून आपल्या आयुष्याचे मोठे स्वप्न पूर्ण केले आहे. यासोबतच नीरजने या प्रसंगी आपल्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

आई सरोज चोप्रा आणि वडील सतीश चोप्रा यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करताना नीरजने लिहिले, “आज आयुष्याचे एक स्वप्न पूर्ण झाले, जेव्हा मी पहिल्यांदाच माझ्या आई-वडीलांना विमानात बसलेले दिसले. सगळ्यांच्या प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच कृतज्ञ राहू.”

त्याच्या चाहत्यांना नीरजची ही पोस्ट खूप आवडली आहे आणि आतापर्यंत त्याला पाच लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

टोकियोमध्ये सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज हा भारताचा पहिला खेळाडू आहे. भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने 87.58 मीटर अंतरावरून भालाफेक करुन सुवर्णपदक जिंकले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे एकमेव सुवर्णपदक होते. तसेच, भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील वैयक्तिक स्पर्धेत हे केवळ दुसरे सुवर्णपदक आहे.

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: