मुंबई लोकलमध्ये विषारी गॅस हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट, सुरक्षा वाढवली

मुंबई : Mumbai Local News:लोकलमध्ये विषारी गॅस हल्ल्याचा दहशतवाद्यांचा (Terrorist ) कट होता, अशी धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे. या कटाची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. (Terrorist Plan Poisonous Gas Attack in Mumbai Local )

दहशतवादी कटाच्या मास्टरमाईंडला अखेर अटक, मुंबई एटीएसची मोठी कारवाई

दिल्लीत 6 दहशतवाद्यांना (Terrorist ) अटक केल्यापासून मुंबईसह सर्व प्रमुख शहरातील सुरक्षा यंत्रणा सर्तक झाल्या आहेत. मुंबईत एटीएस आणि गुन्हे शाखेने आज पहाटे एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याचवेळी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई लोकलवर (Mumbai Local ) विषारी गॅसच्या साहाय्याने हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याची माहिती पुढे आली आहे.(Terrorist  Attack in Mumbai Local ) या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाने रेल्वे पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर रेल्वेच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी काही दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून नवीन माहिती पुढे येत आहे. त्यांनी मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा कट रचला होता. त्यासाठी मुंबई लोकलची रेकी देखील करण्यात आली होती. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. झाकीर नावाच्या व्यक्तीला जोगेश्वरीतून ताब्यात घेण्यात आले आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या जान मोहम्मद अली शेख याचे मुंबई कनेक्शन उघड झाले होते. त्यामुळे दहशतवाद्यांचा मोठा कट होता. पुन्हा एकदा मुंबईला हादरा देण्याचा त्यांचा इशारा होता.

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: