राखी सावंतचं आम आदमी पार्टीच्या नेत्याशी कनेक्शन काय?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत बऱ्याचदा एका ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी त्यांच्या एका वक्तव्यात राखी सावंत यांचे नाव घेतले. यानंतर, जेव्हा राखी सावंतला ही माहिती मिळाली, तेव्हा ती भडकली. यानंतर राखीने राघव चढ्ढाला इशारा दिला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आदल्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. यानंतर आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना लक्ष्य केले आणि त्यांना पंजाबच्या राजकारणाची राखी सावंत म्हटले. जेव्हा राखी सावंतला हे कळले तेव्हा तिने राघव चड्ढाला बरेच खडेबोल सुनावले. तिने राघवला तिच्यापासून दूर राहण्यास सांगितले.

राखीने राघव चड्ढा यांना काय सांगितले?

राखी सावंत यांना माध्यमांनी सांगितले की आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांनी तिला राजकारणाची राखी सावंत म्हटले आहे. यावर राखी म्हणाली, “राघव चड्ढा, माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहा. मिस्टर चड्ढा, तुम्ही स्वतः बघा, ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला माझे नाव हवे होते.”

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: