साहिल खानचं करिअर संपण्यामागे सलमान खानचा मोठा हात, खुद्द बॉडीबिल्डरचा दावा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता साहिल खानवर मुंबईतील मॉडेल आणि बॉडीबिल्डरच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल सतत मनोजला करियर संपवेल अशी धमकी देत होता, याप्रकरणी साहीलवर आरोप दाखल करण्यात आले आहेत. यामुळे त्याने 16 सप्टेंबर रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे ही पहिलीचं वेळ नाही जेव्हा साहील वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याआधी देखील तो अनेक कारणांमुळे चर्चेत आला आहे.

सलमान खानवर गंभीर आरोप 
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर साहीलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केले. साहील म्हणाला, ‘फार कमी लोकांच्या आयुष्यात असा दिवस येतो. जेव्हा एका प्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हर पेजवर दोन मोठ्या अभिनेत्यांसोबत माझा फोटो होता… त्याने अनेक वेळा मला रोल ऑफर केले आणि अखेर मला काढून टाकलं… ‘

साहील पुढे म्हणाला, ‘असं माझ्यासोबत अनेकवेळा झालं. सुशांतसोबत देखील. इंडस्ट्रीमध्ये फक्त स्टार किड्सना संधी मिळते… मोठे कलाकार बाहेरच्यांना येवू नाहीत.. तुझ्या आत्म्याला शांती मिळो सुशांत…. ‘

सना खानच्या बॉयफ्रेन्डसोबत वाद
2014 साली साहिल खान आणि अभिनेत्री सना खानचा एक्स-बॉयफ्रेन्ड इस्माईल खानसोबत मुंबईतील एका जिममध्ये जोरदार भांडण झाले. भांडणाचे कारण दोघांमधील व्यावसायिक करार असल्याचे सांगितले गेले. दरम्यान, अशी बातमी आली होती की इस्माईलने सना खान आणि साहिलच्या वाढत्या जवळीकीवर संशय घेत तिच्यावर हात उगारला होता, नंतर अफेअरच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले.

साहिल खान आणि आयशा श्रॉफ यांनी मिळून एक प्रॉडक्शन कंपनी सुरू केली, ज्या अंतर्गत  ‘जिस देश में गंगा रहता है’ आणि ‘बूम’ सारखे चित्रपट तयार झाले आहेत. प्रोडक्शन कंपनी फ्लॉप झाल्यानंतर आयेशाने 2014 मध्ये साहिलवर 4 कोटी रुपये परत न केल्याचा आरोप करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

त्याबदल्यात साहिल खानच्या वकिलाने साहिल आणि आयेशाची प्रायव्हेट फोटो कोर्टात दाखवून सिद्ध केले होते की व्यावसायिक भागीदार असण्याव्यतिरिक्त ते रिलेशनशिपमध्ये होते आणि ब्रेकअपनंतर आयेशाने साहिलला अडकवण्याचा प्रयत्न केला.

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: