Sidharth Shukla च्या निधनानंतर 3 आठवड्यांनी समोर आला Shehnaaz Gill चा व्हिडिओ

मुंबई :  सुप्रसिद्ध टीव्ही कलाकार सिद्धार्थ शुक्लाने 2 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्ला आता आमच्यात नाहीत. बिग बॉस 13 च्या विजेतेच्या निधनाला दोन आठवड्यांहून अधिक काळ उलटला आहे. दरम्यान, चाहते शेहनाज गिलसाठी प्रार्थना करत आहेत. सिदनाजला डोक्यावर ठेवणारे चाहते शेहनाज गिल बातमी जाणून अस्वस्थ आहेत.

आता शेहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ती खूप दुःखी दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शेहनाज गिल एक पंजाबी गाणे गात आहे. व्हिडिओमध्ये, चाहते सतत कमेंट करत आहेत. तिने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे,  शेहनाज गिलचा हा व्हिडिओ कधीचा आहे? कोणालाही काही माहीत नाही, पण शेहनाजचा हा व्हिडिओ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतरचा असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.

सिद्धार्थवर अंत्यविधी सुरु असताना शेहनाज गिल स्वत:ला सांभाळून शकली नव्हती. ती अगदी जमिनीवर कोसळली होती. शेहनाजचा हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तिच्या चेहऱ्यावर सिद्धार्थ लांब गेल्याचं दु:ख साफ दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

source:zeenews

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: