कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपींना मुंबईतून अटक

कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपींना मुंबईतून अटक

मुंबई: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे बनावट सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने ही कारवाई केली. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. जुबेर शेख आणि अल्फैज खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते सध्या मुंबईच्या वडाळा भागात राहत असून, आरोपी हे मुळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी पाठवला बनावट ग्राहक

या कारवाईबाबत बोलताना कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांनी सांगितले की,जुबेर नावाचा व्यक्ती कुर्ला परिसरामध्ये बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्राचे वाटप करत आहे. ज्या लोकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही, त्यांना पैशांच्या मोबदल्यात दोन्ही डोस घेतल्याचे सर्टिफिकेट देण्यात येत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी आरोपींकडे एक बनावट ग्राहक पाठवला, त्याने प्रमाणपत्राची मागणी केली. त्य़ाला प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तुम्ही मला फक्त तुमचा मोबाई नंबर, आधारकार्ड नंबर आणि  दोन हजार रुपये द्या, मी तुम्हाला प्रमाणपत्र देतो असे आरोपीने संबंधित व्यक्तीला सांगितले. बनावट प्रमाणपत्र देत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी आरोपी जुबेर याला अटक केली.

तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती

दरम्यान जुबेरची चौकशी सुरू असताच अल्फैजचे नाव या प्रकरणात समोर आले. पोलिसांनी दुसार आरोपी अल्फैज याला वडाळा परिसरातून अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी मुळ उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी आहेत. दरम्यान आता या टोळीने कोणाकोणाला बनावट प्रमाणपत्रे वाटली, या टोळीमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याच तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

source:tv9news

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: