Pune Gang Rape | आधी तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, मग अल्पवयीन तरुणीवर गँगरेप, पुण्यात खळबळ

Pune Gang Rape | आधी तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, मग अल्पवयीन तरुणीवर गँगरेप, पुण्यात खळबळ

पुणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी यापैकी दोघा आरोपींनी एका मुलावरही अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हवेली पोलिसांनी या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नीलेश नेटके, लक्ष्मण पाटील या दोघांच्या शिवाय तीन जण अल्पवयीन आहेत. अशा पाच जणांनी मिळून अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तरुणावर अनैसर्गिक अत्याचार

धक्कादायक म्हणजे, तीन दिवसांपूर्वी याच गुन्ह्यातील दोन आरोपींनी एका तरुणावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. आता अल्पवयीन तरुणी वर गँगरेप केल्या प्रकरणी पॉस्को कायद्याच्या अंतर्गत पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

वाशिममध्येही विद्यार्थ्यावर शिक्षकाचा अनैसर्गिक अत्याचार

याआधी, वाशिम जिल्ह्याच्या कारंजा शहरात शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती.
12 वर्षीय विध्यार्थ्याने शिक्षकाची तक्रार कारंजा पोलिसात केल्यानंतर शिक्षकाविरुद्ध कारंजा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. 45 वर्षीय शिक्षकाने आणखी कुणासोबत असे कृत्य केलं आहे का, याचा तपास कारंजा पोलीस करत आहेत.

source:tv9news

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: