बड्या सेलिब्रिटीच्या मुलाला नराधमपणा नडला; अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवला आणि….

बड्या सेलिब्रिटीच्या मुलाला नराधमपणा नडला; अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवला आणि….

मुंबई : श्रीमंती किंवा कोणत्याही गोष्टीचा उन्मत्तपणा व्यक्तीला अशा अडचणीत टाकतो की त्यातून बाहेर येणं जवळपास अशक्य. अशाच अडचणीत एका सेलिब्रिटीचा मुलगा सापडला आहे. ज्याचा माज त्यालाच नडला आहे.

फॅशन डिझायनर बिडप्पा यांचा मुलगा अॅडम बिडप्पा यानं कन्नड अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवले, ज्यामुळे त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मी आणि माझं कुटुंब सध्या अतिशय आव्हानात्मक प्रसंगातून जात आहोत, कारण एका मोठ्या व्हीआयपीच्या मुलानं माझ्यावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून हल्ला केला आहे, असं तिनं सांगितलं.

पोलीस तक्रार करत अभिनेत्रीनं आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाला वाचा फोडत तिला आलेले मेसेज अतिशय अपमानास्पद, क्रूर आणि घृणास्पद असल्याचं सांगितलं.

सात महिन्यांची गरोदर असणाऱ्या या अभिनेत्रीने मी नकारात्मक उर्जा निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नांत असतानाच हे असं घडणं मानसिक आरोग्यावर परिणाम करणारं ठरणार आहे, असं ती म्हणाली.

इंदिरानगर पोलिस स्थानकात तिनं यासंदर्भातील तक्रार दाखल केली. अॅडमनं नशेत असताना अनेकदा इतरांनाही असे मेसेज केल्याचं तिला त्याच्या आईकडून सांगण्यात आलं.

पण, मी असह्य असून आता स्वत:ला सुरक्षित ठेवणं हा एकच उपाय माझ्याकडे आहे, असंही ती म्हणाली.

source:zeenews
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: