मुंबई : Apple प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Apple ने नुकताच त्यांचा अजून एक फोन लाँच केला आहे. या वर्षाच्या पहिल्या इव्हेंटमध्ये Appleने सर्वात स्वस्त असा 5G iPhone, iPhone SE 3 लाँच केला आहे. सर्वात कमी किंमत असलेल्या या iPhoneमध्ये ग्राहकांना लेटेस्ट iPhone 13 कमालीचे फिचर्स मिळणार आहेत.
Appleने त्यांच्या इव्हेंटमध्ये iPhone SE 3 (2022) लाँच करत ग्राहकांना खुशखबर दिली आहे. iPhone SE 3 (2022) A15 बायोनिक चिपनुसार काम करेल. याच चिपच्या आधारावर iPhoneचं टॉप मॉडल, iPhone 13 काम करतं. iPhone SEला 4.7-इंचाच्या रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं डिझाईन पाहिलं तर Appleच्या या लेटेस्ट फोनमध्ये अॅरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियम आणि ग्लासचं डिझाईन देण्यात आलं आहे.
लेटेस्ट फीचर्सबाबत माहिती दिल्यानंतर Appleने याची किंमतही जाहीर केली आहे. कंपनीने सांगितलंय की, iPhone SE 3 (2022) ला 429 डॉलरच्या ग्लोबल किंमतीवर लाँच केलं जातंय आणि भारतात याची किंमत 43,900 रूपये असेल.
iPhone SE 3 हा फोन 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये आणि मिडनाईट, स्टारलाईट आणि लाल रंगामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. 11 मार्चपासून याला तुम्ही प्री-ऑर्डर करू शकता. 18 मार्च पासून हा विकण्यासाठी उपलब्ध असेल.