माझ्यावर कोणाचाच विश्वास नव्हता…; अखेर Virat Kohli कडून खंत व्यक्त

माझ्यावर कोणाचाच विश्वास नव्हता…; अखेर Virat Kohli कडून खंत व्यक्त

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आता रॉयल चॅलेंजर बंगळूरूकडून आयपीएलमध्ये खेळतो. 2008 पासून विराट कोहली आरसीबीच्या ताफ्यात आहे. आरसीबीने 2008 मध्ये ड्राफ्टद्वारे विराट कोहलीची निवड केली होती. यानंतर दुसऱ्या कोणत्या आयपीएलच्या टीममध्ये विराट कोहली दिसला नाही. दरम्यान यावरूनच आता विराटने एक मोठं विधान केलं आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या  इनसाइड आरसीबी शो मध्ये विराटने अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. यावेळी इतर फेंचायझींना मला त्यांच्यासोबत घेण्याची संधी होती, मात्र कोणीही विश्वास दाखवला नसल्याची खंत विराटने बोलून दाखवली.

विराट कोहली म्हणाला, या फ्रँचायझीने मला गेल्या 3 वर्षांत जे काही दिलंय आणि माझ्यावर विश्वास निर्माण केला ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण अनेक टीम्सना संधी होती. मात्र, त्यांनी मला साथ दिली नाही आणि त्यांनी मला त्यांच्यासोबत घेतलं नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता.

विराट पुढे म्हणतो, मी मेगा ऑक्शनमध्ये यावं आणि माझं नाव पुढे करावं, यासाठी माझ्याशी अनेकदा संपर्क झाला. पण, मी त्याचा विचार केला. मुळात अनेकांची अशी इच्छा आहे की, मी माझं नाव मेगा ऑक्शनमध्ये द्यावं, असंही विराट कोहलीने सांगितलं आहे.

source:zeenews
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: